कोरेगाव-भीमा प्रकरणी न्यायासाठी मुंबईत मंत्रालयाबाहेर आंदोलन
कोरेगाव-भीमा प्रकरणी न्याय मिळावा या मागणी साठी आरपीआय खरात गटाचे सचिन खरात यांनी मंत्रालयाच्या गेट बाहेर आंदोलन केलं.
मुंबई : कोरेगाव-भीमा प्रकरणी न्याय मिळावा या मागणी साठी आरपीआय खरात गटाचे सचिन खरात यांनी मंत्रालयाच्या गेट बाहेर आंदोलन केलं.
यावेळी पोटावर थुंकदाणी आणि पाठीमागे झाडू बांधून अनोखं आंदोलन करत पेशवाईचा निषेध करत असल्याचं सचिन खरात यांनी सांगितलं. सरकार या प्रकरणी ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप खरात यांनी केला.
कॅबीनेटच्या मंत्रीमंडळ बैठकीच्या निमीत्तानं मंत्रायलय गेटजवळ गर्दी असतांना सचिन खरात यांच्या अचानक आंदोलनानं एकच धावपळ उडाली. काही मिनिटं आंदोलन केल्यावर पोलिसांनी सचिन खरात आणि त्यांच्याबरोबर आंदोलन करणा-यांना ताब्यात घेतलंय.