पती Sameer Wankhede आरोपांच्या कचाट्यात असतानाच क्रांती रेडकर म्हणाली की, `मुर्ख बनवण्याच्या...`
kranti redkar on Sameer Wankhede : एनसीबीचे (NCB) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशातच त्यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर हिने दोन व्हिडीओ शेअर केला आहे.
Kranti Redkar Video : एनसीबीचे (NCB) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मुंबई सीबीआयने (CBI) रविवारी समीर वानखेडे यांची तब्बल 5 तास चौकशी, पहिल्या सत्रात तीन तास आणि दुसऱ्या सत्रात दोन चौकशी झाली. दुसरीकडे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समीर वानखेडे यांच्यावर निलंबनाची (Suspension) कारवाई होण्याची शक्यता आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीने हिने 18 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा जबाब दिला होता. त्याच वेळी शाहरुख खान आणि समीर वानखेडे यांचे व्हाटस्अप चॅट समोर आले. त्यामुळे समीर वानखेडे दिवसेंदिवस या प्रकरणात खोल घुसत चालेल आहे. अशावेळी समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर हिने दोन व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. (kranti redkar Instagram video on sameer wankhede mumbai cbi interrogation aryan khan drugs case)
'मुर्ख बनवण्याच्या...'
पहिल्या व्हिडीओमध्ये तिने कोणाचं नाव न घेता मुर्ख बनवण्याच्या पद्धती बदल सांगितलं आहे. ती म्हणते की, ''मुर्ख बनवण्याच्या दोन पद्धती असतात. एक जे खरं नाही त्यावर विश्वास ठेवणं, दुसरं म्हणजे जे खरं आहे त्यावर विश्वास ठेवण्यास नकार देणं. पुन्हा एका शांतपणे ऐका आणि समजून घ्या.''
क्रांतीला झाली हिटरलची आठवण
नुकताच तिने अजून एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तिला हिटलरची का आठवण झाली असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या व्हिडीओमध्ये हिटलरची 'बिग लाय' थिअरी सांगण्यात आली आहे. या व्हिडीओमधून हिटलरचे आत्मचरित्र माइन कांफचा एक दाखला देण्यात आला आहे.
लोकांना फसवण्यासाठी एवढं खोटं बोला की समोरच्याचा विश्वास बसेल की, आणि ते म्हणतील कोणी एवढं खोटं कशाला बोलेल? काही तथ्य तर असेलच ना यामध्ये? याशिवाय एवढं मोठं खोटं आत्मविश्वासाने बोला की, लोक त्यालाच खरं मानतील.
दुसरी थिअरी अशी होती की, खोटं सतत बोलत रहा. खोटं इतक्यांदा बोला की, लोकांना वेगवेगळ्या ठिकाणाहून फक्त खोटंच ऐकू येईल, असं केल्याने लोकांचा खोट्यावर अधिक विश्वास बसू लागतो.'
तर तिसरी थिअर म्हणजे, यात लोकांना आपल्या बोलण्यात मध्ये मध्ये अर्ध सत्य सांगायचं. कारण सध्याच्या युगात लोकांना मोठं खोटं पटकन कळून येतं. यामुळे लोकांचा विश्वास बसण्यासाठी मध्ये मध्ये अर्ध सत्य बोला.' त्यानंतर या व्हिडीओच्या शेवटी क्रांती आपलं मत मांडते, ती म्हणाली की,'याच टेक्निकचे शिकार आम्ही आणि तुम्ही...'
क्रांती कायम समीर वानखेडेच्या मागे खंबीरपणे उभी असते. यापूर्वीही तिने असे व्हिडीओ शेअर केले आहेत.