कुर्ल्याची सिद्धार्थ कॉलनी ४ दिवसांपासून अंधारात
सिद्धार्थ कॉलनी मागील चार दिवसा पासून अंधारात आहे.
मुंबई : कुर्ला पूर्व द्रुतगती मार्गावर असलेल्या सिद्धार्थ कॉलनी मागील चार दिवसा पासून अंधारात आहे. सिद्धार्थ कॉलनी त १२०० घरांची वीज तोडण्यात आली असल्याने अनेक कुटुंब अंधारात राहत आहे त्यामुळे स्थानिकांनी वीज कंपनी विरोधात मोर्चा काढला., तर सिद्धार्थ नगर राहिवाशांनी मागील १० वर्षांपासून वीज बिल भरणा केला नव्हता असा खुलासा कंपनीने केलाय. त्यामुळे बिल थकीत झाले अखेर विजकंपनीने त्यांची वीज तोडली . तर मागील १० वर्षे कंपनीने कोणाच्या सांगण्यावरून कारवाई केली नाही आताच का वीज तोडली असा सवाल मोर्चेकऱ्यानी करत संबधित विकासकासह अन्यही नेत्यांवर टीका केलीय.