रुग्णालयांमध्ये डॉक्टर, नर्सेससह इतर स्टाफची कमतरता..तात्पुरत्या स्वरूपात कर्मचारी नेमले जाणार
महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.
कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : कोनोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. परिणामी कोरोना व्हायरसच्या संकटामुळे मुंबई महापालिका रूग्णालयांमध्ये डॉक्टर, नर्सेससह इतर स्टाफ कमी पडत असल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे गरज पाहाता तात्पुरत्या स्वरूपात कर्मचारी नेमले जाणार असल्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. अतिदक्षता विषयक तज्ज्ञ, डॉक्टर, नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, 'क्ष' किरण तंत्रज्ञ, वॉर्डबॉय, कामगार इत्यादींची तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक करणार आहे.
अधिष्ठाता, उपायुक्त, कार्यकारी आरोग्य अधिकारी, प्रमुख वैद्यकीय अधीक्षक आणि सहाय्यक आयुक्त यांना कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचा विशेष अधिकार प्रदान करण्यात आला आहे. गरज लक्षात घेऊन आणि अर्जदाराकडे आवश्यक ती शैक्षणिक पात्रता व अनुभव असल्याची खात्री करून संबंधित अधिकारी तात्पुरती नेमणूक करणार आहेत
अतिदक्षता विषयक तज्ज्ञांना दरमहा रुपये दीड ते दोन लाख, एम.बी.बी.एस. डॉक्टर असल्यास दरमहा रुपये ८० हजार, बी.ए.एम.एस. असल्यास दरमहा रुपये ६० हज़ार आणि बी.एच.एम.एस. डॉक्टरांना दरमहा रुपये ५० हजार दिले जाणार असून परिचारिकांना, प्रयोगशाळा तंत्रज्ञांना व इतर तंत्रज्ञांना दरमहा रुपये ३० हजार; तर वॉर्डबॉय, कामगार इत्यादींना दरमहा रुपये २० हज़ार एवढे मानधन दिले जाईल.
दरम्यान, महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. नव्या रुग्णांमध्ये मुंबईतील ९२, नवी मुंबईतील १३, ठाणे १०, वसई-विरारमधील ५ तर रायगडमधील एकाचा समावेश संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढवला आहे.