मुंबईत पैशाच्या वादातून महिलेची हत्या

महिलेचा गळा चिरुन हत्या
मु्ंबई : मुंबईतल्या वांद्रयांत पैशांच्या वादातून एका महिलेचा गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे. वांद्रे पश्चिमेतील लव्हली स्टोअरसमोर रिलायबल कन्स्ट्रक्शनचा रिकामा प्लॉट आहे. या प्लॉटवरील पत्र्याच्या रिकाम्या शेडमध्ये खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
अर्चना नावाच्या साधारण ४० ते ४५ वर्षं वयाच्या महिलेचा खून झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.