मुंबई :  छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गडकिल्ले हे प्रत्येकासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी अशी गोष्ट. शिवजयंतीच्या निमित्तानं मुंबईतल्या लालबाग परिसरात शिवरायांच्या याच ख-याखु-या स्मारकांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवरायांच्या किल्ल्यांवर प्रत्यक्ष जाता येणं शक्य नाही, त्यांच्यासाठी ही पर्वणीच ठरली आहे. तर प्रत्यक्ष किल्ल्याप्रमाणे हूबेहूब साकारण्यात आलेल्या प्रतिकृती विद्यार्थ्यांना आणि अभ्यासकांना भूरळ घालताहेत. 


एकाहून एक सरस अशा किल्ल्यांकडे पाहिल्यावर कोणत्याही मराठी माणसाची छाती अभिमानानं उंचावल्याशिवाय राहणार असं हे किल्लांचं प्रदर्शन. 


मुंबईतल्या मराठीबहुल लालबागमधल्या मेघवाडी इथं बाल विकास मंडळानं शिवजयंती निमित्तानं दोन दिवसीय किल्ल्यांचं प्रदर्शन भरवलं आहे. बाल विकास मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून शिवजयंतीला शिवरांयांचा पराक्रम सांगणा-या प्रदर्शनांचं आयोजन करत आहे.