मुंबई : लालबाग सिलिंडर स्फोटाप्रकरणी (Lalbagh cylinder blast) पितापुत्रांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिलिंडर गळती (cylinder blast) असल्याचे लक्षात आणून दिल्यावरही दुर्लक्ष केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मंगेश राणे आणि त्यांचा मुलगा यश राणे यांच्यावर काळाचौकी पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राणे कुटुंबियांचा केटरिंगचा व्यवसाय आहे. त्यांच्या घरी लग्नाची घाई असतानाच सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झालेत. मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख तर जखमींना ५० हजार अशी मदत मुख्यमंत्री कार्यालयातून जाहीर करण्यात आली आहे.  दरम्यान,सर्व जखमींना केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. 


दरम्यान, लालबाग परिसरातील साराभाई इमारत गॅस सिलिंडर स्फोट दृर्घटनेमधील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.