मुंबई : दरवर्षी वेगवेगळ्या कारणामुळे वादात सापडणारं लालबागच्या राजाचं मंडळ पुन्हा एकदा आपल्या कार्यकर्त्यांमुळे वादात सापडलं आहे. या कार्यकर्त्यांची मुजोरी यावर्षी ही सुरुच आहे. राजाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांशी तर हे कार्यकर्ते असभ्यपणे वागतातच पण आता थेट पोलिसांनाच धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक येथे येत असतात. अनके तास रांगेत उभे राहून ते राजाचं दर्शन घेतात. पण या दरम्यान कार्यकर्ते भाविकांशी देखील असभ्यपणे वागतात. या देखील आधी अशा घटना समोर आल्या आहेत. याआधी राजाच्या चरणाजवळ उभे असले कार्यकर्ते महिला किंवा ज्येष्ठ नागरिकांना ढकलून देत असतानाचा प्रकार देखील समोर आला होता. यामुळे महिलांनी पोलिसांकडे तक्रार देखील केली होती.


तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर.आर.पाटील यांनी त्यावेळी या कार्यकर्त्यांना दम देखील भरला होता. कार्यकर्त्यांनी महिलांशी नीट वागावे, या सर्व प्रकरणाची योग्य चौकशी केली जाईल जर वेळ आली तर मंडळावर गुन्हेही दाखल केले जाईल असं त्यावेळी आर. आर पाटील यांनी स्पष्ट केले होते.