मुंबई : लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि गणेश गल्लीचा गणपती यासाठी शनिवार आणि आज रविवारी भक्तांची मोठी गर्दी होत आहे. या दरम्यान करीरोड आणि चिंचपोकळी स्टेशनच्या पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यातच दुष्काळात तेरावा महिना असल्यासारखं, या रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेने मेगाब्लॉक कायम ठेवला आहे. तेव्हा गणेश भक्तांनी रविवारी सकाळी ११ ते दुपारी ४.३० पर्यंत लोकल गाड्या कमी असतील, अशा हिशेबानेच बाप्पाच्या दर्शनाला निघालेलं बरं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१) हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक
२) पश्चिम रेल्वेवरही बोरीवली ते भाईंदर धीम्या मार्गावर मेगाब्लॉक
३) मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा धीम्या मार्गावर मेगाब्लॉक


मुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळ दुरुस्ती आणि देखभालीसाठी हा ब्लॉक घेण्यात येईल. मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा धीम्या मार्गावर, हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. 


पश्चिम रेल्वेवरही मेगाब्लॉक आहे. बोरीवली ते भाईंदर धीम्या मार्गावर ब्लॉक असेल. सकाळी अकरा ते दुपारी साडेचारपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने गणेशभक्तांचे हाल होणार आहेत.