मुंबई : मुंबईतल्या वडाळ्यात आज पुन्हा एकदा भूस्खलन झालं. लॉईड इस्टेटमधील जमीन पुन्हा खचली आहे. हे भूस्खलन मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालंय. सोमवारी पहाटे झालेल्या भूस्खलनात २० गाड्या ढीगाऱ्याखाली गेल्या होत्या. विद्यालंकार रोडवरच्या लॉईड इस्टेट परिसरात दोस्ती पार्क इमारत बांधण्याचं काम सुरु असून त्यासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला. त्यामुळंच ही संरक्षक भिंत कोसळल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. या दुर्घटनेत पार्किंग केलेल्या गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही रस्त्याच्या दर्जाबाबत मात्र प्रश्न उपस्थित केला जातोय. याप्रकरणी दोस्ती बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.