मुंबई: खंडाळ्यात शनिवारी रात्री रेल्वे मार्गावर दरड कोसळली. मंकीहिल स्थानकानजीक हा प्रकार घडला. अप आणि मिडल लाईनवर ही दरड कोसळल्याने लोणावळ्याकडून मुंबईला जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी ही दरड कोसळली. यामुळे कोल्हापूर-अहमदाबाद एक्स्प्रेस खंडाळा स्थानकात थांबवण्यात आली आहे. सध्या रेल्वे प्रशासनाकडून दरड हटवण्याचे काम सुरु आहे. या मार्गावर शुक्रवारीही दरड कोसळली होती, ती हटवण्यासाटी ६ तासांचा कालावधी लागला होता.