मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांचा अखेरचा प्रवास सुरु झालाय. देशाच्या स्वर कोकिळेच शेवटचं दर्शन घेण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर लोकांची मोठी गर्दी झाली आहे. शिवाजी पार्कवर लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लता मंगेशकर यांचे पार्थिव कोविड प्रोटोकॉलसह शिवाजी पार्कवर नेण्यात येत आहे. सायंकाळी 6.30 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वाटेत लता मंगेशकर यांचे चाहते अंत्यदर्शनासाठी येत आहेत. लता मंगेशकर यांच्यावर सूर्यास्तापूर्वी अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्या कायमच्या पंचभूतांमध्ये विलीन होणार आहेत.



लता मंगेशकर यांचे पार्थिव पूर्ण शासकीय सन्मानाने प्रभूकुंज येथून शिवाजी पार्क येथे नेण्यात येत आहे. लता मंगेशकर यांना निरोप देण्यासाठी चाहते जमले आहेत. लतादीदींचे अंतिम दर्शन प्रत्येकालाच करायचे आहे. या जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. जेणेकरून लता दीदींचे पार्थिव घेऊन जाण्यास कोणतीही अडचण येणार नाही.