Rakesh Jhunjhunwala Last Wish : भारतीय शेअर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला ( Big Bull Rakesh Jhunjhunwala ) यांचं नुकतंच दीर्घ आजारपणाने निधन झालं. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात झुनझुनवाला यांनी अखेरचा श्वास घेतला. राकेश झुनझुनवाला यांच्या जाण्यानंतर आता शेअर्स काय होणार याबाबत सर्वांना अजूनही उत्सुकता आहे. अशात राकेश झुनझुनवाला यांची शेवटची इच्छा ( last wish of jhunjhunwala ) आता पूर्ण झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांनी मागील महिन्यात सिंगर इंडिया (Singer India) या कंपनीत गुंतवणुकीची योजना आखलेली. मात्र त्याआधीच 14 ऑगस्ट रोजीच  झुनझुनवाला यांचं निधन झालं. भारतीय शेअर बाजार सोमवारी स्वातंत्र्य दिवसानिमित्त बंद होता. त्यानंतर मंगळवारी मार्केट उघडताच झुनझुनवाला यांच्या Rare  Rare Enterprises ने बल्क डील्सच्या माध्यमातून Singer India या कंपनीचे 10 टक्के शेअर्स विकत घेतले आहेत. या निमित्ताने राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणुकीची शेवटची इच्छा पूर्ण झाल्याचं समजतंय. 


शेवटची इच्छा झाली पूर्ण 


राकेश झुनझुनवाला यांच्या कंपनीकडून झालेल्या गुंतवणुकीची जेंव्हा शेअर बाजारात माहिती पसरली. त्यानंतर हा शेअर शेअर तब्बल 20% वधारून अपर सर्किटला गवसणी घालताना दिसला. मागील सत्रात 57.65 रुपयांना बंद झालेला शेअर आजच्या सत्रानंतर तब्बल  69.15 रुपयांवर पोहोचला. सिंगर इंडिया या कंपनीतील गुंतवणुकीचा निर्णय हा झुनझुनवाला यांच्या आयुष्यातील बहुतेक शेवटचा निर्णय असल्याचं बोललं जातंय. मात्र, या कंपनीत गुंतवणूक होण्याआधीच झुनझुनवाला यांचं निधन झालं. 


ही कंपनी नेमकं करते काय? 


आता जाणून घेऊयात या कंपनीच्या व्यवसायाबाबत. सिंगर इंडिया ही कंपनी शिलाई मशिन्स आणि त्यासंबंधीत उत्पादनं बनवणारी कंपनी आहे. ही कंपनी घरघुती अप्लायन्सेस देखील बनवते. 


last wish of rakesh jhunjhunwala compleated Rare Enterprises invested in singer india