मुंबई : गेल्या काही दिवसांपासून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या लवकर बऱ्या होऊन घरी परताव्यात यासाठी सर्वजण मनोभावे प्रार्थना करत आहेत. लतादीदींच्या हेल्थसंदर्भात एक मोठी बातमी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, "लता दीदींच्या प्रकृतीत चांगली सुधारणा दिसून येतेय. त्या गेल्या 15 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होत्या. मात्र आता त्यांचं व्हेंटिलेटर काढून टाकण्यात आलेलं आहे."


"न्यूमोनिया आणि कोरोनातून लता दीदी आता बऱ्या झालेल्या आहेत. सध्या ब्रेन इन्फेक्शनमध्ये सुधारणा करण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत. मात्र आता त्या थोडं बोलूही शकतायत. डॉक्टरांना त्या प्रतिसादही देतायत. काही प्रमाणात त्यांना अशक्तपणा असून त्यावर उपचार सुरु असल्याचं," राजेश टोपेंनी सांगितलं आहे.


दरम्यान कालदेखील लता मंगेशकर यांच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट देण्यात आली होती. लतादीदींची तब्येत हळूहळू सुधारत असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं होतं. डॉक्टरांची टीम त्यांच्यावर सतत नजर ठेवून आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर प्रतीत सामदानी यांनी महत्त्वाची माहिती दिली होती.


लता मंगेशकर आता कोरोनामुक्त झाल्या असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होतेय. त्यांचा व्हेंटिलेटरचा सपोर्टही काढण्यात आला आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.