मुंबई : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या आठवणींना गानसम्राजी लता मंगेशकर यांनी उजाळा दिला. तसेच ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आपल्या भावना व्यक्त केल्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचे माजी पंतप्रधान, कवीमनाचे साहित्यिक, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता अशी ओळख असलेले अटल बिहारी वाजपेयी यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अटल बिहारी वाजपेयी प्रकृती खालावल्यामुळे गेले नऊ आठवडे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल होते. गुरुवारी संध्याकाळी ५.०५ मिनिटांनी त्यांचं निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले आहे.



अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाचं वृत्त समजल्यानंतर माझ्यावर जणू डोंगरच कोसळला आहे. मी त्यांना वडिलांच्या जागी मानत होते, आणि त्यांनीही मला मुलीचे स्थान दिले होते. मला ते इतके प्रिय होते की मी त्यांना दादा म्हणायचे. आज मला तेवढंच दु:ख झाले आहे जितक माझ्या वडिलांच्या निधनावेळी झाले होते. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, अशी श्रद्धांजली लता मंगेशकर यांनी वाहिली.