Mumbai Weather Update :  मुंबईकरांनो पुढचे दोन दिवस जॅकेट आणि स्वेटर्स पुन्हा बाहेर काढावी लागणार आहेत.. कारण मुंबईत पारा घसरणार असून पुन्हा थंडी वाढणार आहे. पुढचे दोन दिवस मुंबईच्या किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. पारा घसरल्यानं मुंबईसह नाशिक आणि उत्तर भागात काही प्रमाणात थंडी जाणवेल... जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात मुंबईत चांगलाच गारवा होता. मात्र उत्तरेकडच्या शीत वाऱ्यांची जागा पूर्वीय आणि आग्नेय उबदार वाऱ्यांनी घेतल्यामुळे त्यानंतर मुंबईचं तापमान वाढलं होतं.. मात्र आज सायंकाळपासून पुन्हा तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. (Mumbai Climate Latest News)  


काळजी घ्या!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या 24 तासात उत्तर महाराष्ट्रासह, मुंबई आणि उत्तर कोकणातील काही भागांमध्ये किमान तापमानात कमी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.




हिवाळ्यात पावसाळा? 


जानेवारी महिना संपत आल्या असला तरी थंडीचा पारा कमी होणार आहे. तर हिवाळ्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील दोन दिवसात राज्याच्या (Weather in MH) काही भागात अंशत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (latest weather update mumbai next 2 day 30 january 2023 and 31 january 2023 cold will rise again all india cold and rain prediction video)



दरम्यान उत्तर भारतातील राज्यांबद्दल बोलायचं झालं तर, दिल्लीसह उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि हिमाचलमध्ये पुढील 48 तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. IMD ने वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे रविवार 29 जानेवारी ते सोमवार 30 जानेवारी दरम्यान अनेक राज्यांमध्ये मधूनमधून पावसाचा इशारा दिला आहे.