मुंबई : काही काळापूर्वी राजकारणात येण्यासाठी लोकांना खूप मोठा संघर्ष करावा लागत होता. राजकारणात करिअर करण्यासाठी कोणताही विशेष अभ्यासक्रम नव्हता. पण आता जर तुम्हाला नेता बनायचं असेल तर तुम्हासा एका विशिष्ट पद्धतीचं शिक्षण मिळू शकतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील एका संस्थेने राजकारणात भविष्य बनवण्यासाठी नवा कोर्स सुरू केला आहे. ९ महिन्यांचा हा कोर्स असणार आहे. म्हणजे आता रस्त्यावरुन संसदेत पोहोण्यासाठी तुम्हाला खास शिक्षण मिळणार आहे.


नेते बनण्याचा हा कोर्स राष्ट्रीय स्वयंसेवक संघांशी संबंधित आहे. मुंबईमध्ये हा कोर्स सुरू झाला आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन इन पॉलिटिकल लीडरशिप अँड गव्हर्नन्स असं या कोर्सचं नाव आहे. सुरुवातीलाच या कोर्ससाठी ३२ जणांनी प्रवेश घेतला आहे. एमबीए ते आयआयटीचे विद्यार्थी यामध्ये आहे. यासाठी अडीच लाख रुपये फी असणार आहे.


महाराष्ट्र शिवाय उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, तेलंगना, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेशमधले तरुणांनी येथे प्रवेश घेतला आहे. पश्चिम बंगालमधून अरित्र चट्टोपाध्याय हा एमबीए आहे. पुण्यात ते मॅकेनिकल इंजिनियर म्हणून काम करत होते.


मुंबईतील मीरा-भाईंदरच्या भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची पत्नी सुमन मेहता यांनी देखील या कोर्ससाठी प्रवेश घेतला आहे. यामध्ये सध्या त्या एकट्याच महिला आहेत.