मुंबई : मुंबईचे फुफ्फुस म्हणून ओळख असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांबद्दलची कॅमेरा टँपिंगच्या माध्यमातून रोचक अशी माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय उद्यानातील बिबिट्य़ांटच्या संख्या आता ४१ च्या घरांत पोहोचली आहे. त्यापेक्षा राष्ट्रीय उद्यानातील बिबटे हे भटकंतीला पंसती देणारे - भटके असल्याचं समोर आलं आहे.   


कॅमेरा टॅपिंगच्या माध्यमातून माहिती समोर  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातले हे बिबटे भटकंतीला पसंती देणार आहेत, अशी माहिती देखील कॅमेरा टॅपिंगच्या माध्यमातून समोर आलीय. वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन सोसायटीचे निकीत सुर्वे यांनी २०१७  मध्ये ४९ कॅमेराच्या मार्फत २२ दिवसांमध्ये बिबटयांबद्दलची माहिती गोळा केली. 


गतवर्षी ३५ बिबट्यांची नोंद


त्यानुसार इथं ४१ बिबटे असल्याची नोंद करण्यात आलीय. याआधी २०१५मध्ये अशाच प्रकारे अभ्यास करण्यात आला, तेव्हा ३५ बिबटे असल्याचं आढळलं होतं. याचा अर्थ दोन वर्षांत बिबट्यांची संख्या वाढली आहे.