धावत्या रेल्वेवर दगड फेकला तर होऊ शकते जन्मठेप!
धावत्या रेल्वेगाडीवर दगड मारणाऱ्या विकृतांवर अंकुश ठेवण्यासाठी, पश्चिम रेल्वे सरसावली आहे.
मुंबई : धावत्या रेल्वेगाडीवर दगड मारणाऱ्या विकृतांवर अंकुश ठेवण्यासाठी, पश्चिम रेल्वे सरसावली आहे.
त्याचाच भाग म्हणून धावत्या रेल्वेवर केलेल्या दगडफेकीत प्रवासी तसंच रेल्वे कर्मचारी जखमी झाल्यास, दगड मारणाऱ्याला रेल्वे नियमानुसार जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.
धावत्या रेल्वेवर दगडफेकीचे अनेक प्रकार गेल्या काही महिन्यांमध्ये घडले आहेत. त्यात काही जण जखमीही झालेत. हे प्रकार रोखण्यासाठी दगड फेकून जखमी करणाऱ्याला कठोर शिक्षा ठोठावण्याचा निर्णय घेतला गेलाय.
तसंच जन्मठेप भोगल्यानंतर त्यात आणखी १० वर्षांची वाढ करण्याची तरतूद कायद्यात असल्याचं पश्चिम रेल्वेनं स्पष्ट केलंय.