मुंबई : बातमीपत्राच्या सुरूवातीला पाहूयात या क्षणाची सर्वात मोठी आणि महाराष्ट्राला हादरवणारी बातमी. आयटीच्या रडारवर महाराष्ट्रातले एक दोन नव्हे तर जवळपास ४० आयएएस आणि आयपीएस अधिकारी आहेत. या अधिका-यांनी कोट्यवधींची बेहिशोबी आणि बेनामी मालमत्ता जमवल्याचं आयटीच्या चौकशीत उघड झालंय. विशेष म्हणजे ही मालमत्ता जमवल्याप्रकरणी या बड्या बाबूंना नोटीसाही पाठवण्यात आल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING



या प्रकरणातला आयटीचा फायनल रिपोर्ट झी २४ तासच्या हाती आलाय. नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, उद्योग, एमएसआरडीसी, गृहनिर्माण या खात्यांमधल्या बड्या अधिका-यांचा समावेश आहे. मुंबई पोलिसातल्या बड्या अधिका-यांचीही नावं या भ्रष्ट बाबूंच्या यादीत असल्याचं या रिपोर्टमध्ये समोर आलंय.



विविध खात्यांमध्ये हे बडे अधिकारी कोट्यवधी रुपये घेऊन दलाली करत असल्याचं उघ़ड झाल्यानंतर आयटीनं या विविध खात्यांमधल्या अधिकाऱ्यांवर धाडी घातल्या होत्या. यातून सुमारे ४० अधिका-यांची नावं समोर आली आहेत. आणि या अधिका-यांची यादी झी २४ तासच्या हाती आली आहे.