मुंबई : सोशल मीडियावर दिवसेंदिवस लहान मुलांचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतात. पण या व्हिडिओवरून अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. असा व्हिडिओ अपलोड करताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे याची देखील चर्चा होताना दिसत आहे. या व्हिडिओत एक लहान मुलगी आपल्या आईशी भांडताना दिसत आहे. भांडताना अनेक शब्दांचे अर्थ या चिमुकलीला माहित ही नाही पण भांडतानाचे तिचे चेहऱ्यावरील हाव भाव हे प्रत्येकालाच आकर्षित करत आहे. 


का पाहावा हा व्हिडिओ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


या व्हिडिओत चिमुकली आपल्या आीशी हक्काने भांडत आहे. मात्र भांडताना तिने वापरलेले शब्द हे इतके मोठे आहेत की त्याचा अर्थ देखील तिला माहित नाही. पण भांडताना तिच्या चेहऱ्यावरील हाव भाव हे अतिशय आकर्षित करणारे आहेत. सध्या हा व्हिडिओ याच कारणामुळे व्हायरल होत आहे. 


व्हिडिओ व्हायरल करताना कोणती काळजी घ्यावी 


असा व्हिडिओ अपलोड करताना पालकांनी थोडा विचार करायला हवा अशी चर्चा सोशल मीडियावर होतेय. हा व्हिडिओ अपलोड केल्यामुळे मुलांच्या अशा बोलण्याला आपण प्रोत्साहन देस असल्याची चर्चा होत आहे. तसेच हे व्हिडिओ मुलांच्या बोलण्याला प्रोत्साहन देणारे असले तरीही काही गोष्टींना बंधन हवीत हे नक्की