Dharavi Morcha : धारावीकरांना 500 फूटांचे घर मिळाले पाहिजे; उद्धव ठाकरे यांची मागणी

Sat, 16 Dec 2023-7:55 pm,

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट धारावी पुनर्विकास प्रकल्पा विरोधात आक्रमक झाला आहे. महाविकास आघाडीतर्फे धारावी टी जंक्शन ते बीकेसी पर्यंत अफाट मोर्चा निघाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा बीकेसीकडे वाटचाल करत आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट  धारावी पुनर्विकास प्रकल्पा विरोधात आक्रमक झाला आहे. महाविकास आघाडीतर्फे  धारावी टी जंक्शन  ते बीकेसी पर्यंत अफाट मोर्चा निघाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा बीकेसीकडे वाटचाल करत आहे.  

Latest Updates

  • धारावी पात्र आणि अपात्र ठरवणारे कोण? कोरोनाशी लढून जिंकणारी धारावी अदानीला शरण जाईल का? अपात्र लोकांना मिठागरामध्ये टाकणार. लाखो लोकांना अपात्र करणार. सगळं अदानीच्या घशात घालण्याचा डाव. आता कळलं 50 खोके कुणी दिले. जेव्हा लढम्याची वेळ असते तेव्हा भाजप कुठेच नसते. जेव्हा खरेदी विक्रीची वेळ येते तेव्हाच भाजप येते. धारावीत राहणारे जे घरातून उद्योग चालवतात त्यांच काय करणार? घराला घर दिल्याशिवाय धारावीकरांच्या केसाला धक्का लावू देणार नाही. व्यवसायाला जागा मिळालीच पाहिजे.  

     

  • मुंबईतल्या बांधकाम व्यवसायिकांची सुपारी घेऊन उद्धव ठाकरेंचा आजचा धारावीतला मोर्चा आहे. स्वतः अडीच वर्ष मुख्यमंत्री होते तेव्हा धारावी बद्दल का काही केलं नाही ? स्वतःच्या आर्थिक हितासाठी उद्धव ठाकरेंचा हा मोर्चा आहे.  टी डी आर बद्दल उद्धव ठाकरे यांचे आरोप खोटे आहेत. अस म्हणत  खासदार राहुल शेवाळे यांनी मोर्चावर टीका केली आहे.  धारावीत 40 वर्ष सत्ता उपभोगलेल्या गायकवाड कुटुंबानेही धारावीसाठी काहीही केलेले नाही.  उद्धव ठाकरे यांचा आजचा मोर्चा संशयास्पद आहे.  राहुल गांधी इंडिया आघाडी यांच्यासमोर स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा मोर्चा आहे राहुल गांधींचा विरोध आहे म्हणून यांचा विरोध आहे. मुंबई विमानतळ अदानी चालवतात मातोश्री मध्ये वीजही आदानी यांचीच आहे. मग ही वीज वापरणार नाही का ? मुंबई विमानतळावरून उद्धव ठाकरे जाणार नाहीत का ? शिवसेना भवन बांधण्यासाठी आठ इमारती पाडण्यात आल्या त्या मराठी लोकांना अद्यापही घर मिळालेले नाहीयेत. मुंबईतील हजारो मराठी लोकांच्या घरांचा प्रश्न रखडलेला आहे मग त्यांच्यासाठी उद्धव ठाकरे का मोर्चा काढत नाहीत ? असा सवाल देखील राहुल शेवाळे यांनी उपस्थित केला आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link