वाहत्या पाण्यातली मस्ती नडली! मालाडमध्ये धबधब्यात वाहून गेला तरुण; घटनेचा Live Video
Viral Video : राज्यासह मुंबईत पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसाचा आनंद घेतण्यासाठी तरुणाई बाहेर पडली आहे. मात्र अनेक ठिकाणी पावसाचा आनंद घेता घेता अपघाताच्या गंभीर घटना देखील घडल्या आहेत. मालाडमध्येही अशाच प्रकारे पावसाचा आनंद घेणारा मद्यधुंद अवस्थेतील तरुण वाहून गेला आहे
Mumbai Accident : मुंबईतील मालाड (Malad Accident) पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून (Sanjay Gandhi National Park) बाहेर पडणाऱ्या धबधब्यात 25 वर्षीय तरुणाचा बुडाल्याची घटना समोर आली आहे. मद्यधुंद अवस्थे हा तरुण धबधब्याच्या मध्यभागी जाऊन उभा होता. त्याच्या मित्राने त्याला ओढत बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र हात निसलटल्याने मद्यधुंद अवस्थेतील तरुण पाण्याच्या जोरदार प्रवाहासह वाहून गेला आहे. स्थानिकांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना (Mumbai Police) दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधाशोध सुरु केली आहे. मात्र अद्यापही तरुणाचा शोध लागलेला नाही.
चंदन शाह असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. 25 वर्षीय चंदन शाह मद्यधुंद अवस्थेत जोरदार प्रवाहाने वाहणाऱ्या धबधब्याच्या मध्यभागी जाऊन उभा होता. त्याला वाचवण्यासाठी त्याचा मित्र पाण्यात गेला होता. मात्र नशेच्या अवस्थेत तरुणाला स्वत:वर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यामुळे चंदनचा त्याचा पाय घसरला. त्याच्या मित्राने चंदनला त्याला पकडण्याचा प्रयत्न केला.
मात्र धबधब्याच्या वेगवान प्रवाहामुळे चंदन वाहून गेला. त्यानंतर स्थानिक लोकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याचा काही शोध लागला नाही. त्याचा बुडून मृत्यू झाला असावा अशी माहिती स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाला देण्यात आली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन बचावकार्य सुरू करण्यात आले होते. धबधब्याच्या प्रवाहाच्या वेगामुळे चंदन शहा अद्याप सापडलेला नाही. दुसरीकडे कोणत्याही सुऱक्षेशिवाय तरुण तिथे पाण्यात उभी असल्याचे व्हिडीओमधून समोर आले आहे.
सेल्फी काढताना समुद्रात वाहून गेली महिला
काही दिवसांपूर्वी मुंबईच्या वांद्रे येथील समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलेल्या महिलेचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. मुंबईच्या बँडस्टँड किनाऱ्याजवळ सेल्फी काढत असताना आलेल्या लाटेत वाहून गेल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. दिवसभराच्या शोधकार्यानंतर महिलेचा मृतदेह दुसऱ्यादिवशी सापडला आहे. ज्योती सोनार असं मृत महिलेचं नाव होतं. समुद्रातील या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हायरल व्हिडिओमध्ये ज्योती सोनार पतीसोबत सेल्फी काढत होती. मात्र लाटेमुळे ती समुद्रात वाहून गेली.