मुंबई : शेतकरी कर्जमाफी योजनेच्या पहिल्या टप्प्यात आज साडे आठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. सलगच्या तीन सुट्ट्यांमुळे पैसे जमा होण्यास उशीर झाला, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी 18 ऑक्टोबरचा मुहूर्त शोधण्यात आला होता. राज्य सरकारकडून प्रातिनिधिक स्वरुपात प्रत्येक जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्र देण्यात आलं होतं. तर उर्वरित शेतकऱ्यांचे पैसे लगेच खात्यात जमा होतील, असं सांगण्यात आलं होतं. चार दिवस उलटूनही पैसे जमा न झाल्याने शेतकरी संभ्रमावस्थेत होते. 


पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांसाठी चार हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आजपासून खात्यात पैसे जमा होतील, असं सुभाष देशमुख यांनी सांगितलं. राज्यातील सुमारे 89 लाख शेतकऱ्यांना 34 हजार 22 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. 24 जून रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता.