कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी ७ दिवसांची मुदत वाढ
कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी राज्यसरकारने ७ दिवसांची मुदत वाढ दिली आहे.
मुंबई : कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी राज्यसरकारने ७ दिवसांची मुदत वाढ दिली आहे, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.
कर्जमाफीचा अर्ज भरण्याची मुदत १५ सप्टेंबर रोजी संपणार होती, मात्र यानंतर आणखी ७ दिवसांची मुदत वाढ दिली जाणार आहे, अशी माहिती सुभाष देशमुख यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतर ७ दिवसांची मुदत वाढ दिली असल्याचं सांगण्यात येत आहे, यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक ठिकाणी लोडशेडिंग, तसेच वेबसाईट उघडत नसल्याने अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत.
ऑनलाईन अर्ज भरताना अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी येत आहेत, अनेक अडचणी या अर्ज भरताना समोर येतात, अखेर ऑप्शन उपलब्ध नसल्याने, मेल केल्यानंतर त्यात सुधारणा केली जाते.