मुंबई: मध्य रेल्वेच्या कांजुरमार्ग स्थानकात मंगळवारी दुपारी झालेल्या अपघातात एका महिलेचा जीव थोडक्यात बचावला. या अपघाताचा थरार स्थानकातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.  ही महिला गाडीतून उतरत असताना तिचा पदर दरवाज्यात अडकला. त्याचवेळी गाडी सुरू झाली. गाडी सुरु झाल्यावर महिला गाडीसोबत खेचली गेली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही महिला अक्षरशः गाडीखाली गेली असती. मात्र, स्थानकावर तैनात असलेले आरपीएफ जवान राजकमल यादव यांनी क्षणाचाही विलंब न लावता तिला बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. तिचा जीव वाचवताना ते स्वतःही पडले. पण ते त्वरीत उठले आणि महिलेचे प्राण वाचवले.