मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा, पावसाने सखल भागात पाणी तर लोकल सेवा विस्कळीत
Mumbai Rains : महाराष्ट्राच्या राजधानीत रविवारी पावसाचा तडाखा दिल्यानंतर भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मुंबईमध्ये (Mumbai) मेघगर्जनेसह गडगडाटीसह मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.
मुंबई : Mumbai Rains, weather, Local Trains, News : महाराष्ट्राच्या राजधानीत रविवारी पावसाचा तडाखा दिल्यानंतर भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मुंबईमध्ये (Mumbai) मेघगर्जनेसह गडगडाटीसह मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. उपनगरे आणि अन्य ठिकाणी अती मध्यम ते अती मुसळधार पाऊस (Mumbai Rain) पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचवेळी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य मार्गावर ( Central Main Line) आणि हार्बर मार्गावरील ( Harbour Line) लोकल सेवेवर परिणाम झाला. लोकल सेवा विस्कळीत झाल्याने अनेक गाड्या उशिराने धावत आहे. त्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीला चाकरमान्यांचे मोठे हाल झाले आहेत.
मुंबईत पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. (Mumbai Rain Update) पूर्व, पश्चिम उपनगरांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. विक्रोळीत रस्त्यांना नदीचे रुप आले आहे. मुंबईत पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाल्याने याचा परिणाम हा वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे. Local Trains सेवेसंदर्भातील हाती आलेल्या माहितीवरून असे दिसून आले आहे की मुंबईतील सेंट्रल मेन लाइन, हार्बर लाइन आणि ट्रान्स हार्बर मार्गावर गाड्या उशिराने धावत आहेत.
दरम्यान, बदलापुर स्टेशनवर रेल्वेकडून सूचना देण्यात आली आहे. मुंबईत होत असलेल्या जोरदार पाऊसामुळे कोणतीही लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे रवाना होणार नाही. पुढील सूचना येईलपर्यंत कोणतीही रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे होणार नाही. त्यामुळे येथे प्रवासी अडकून पडले आहेत.
कल्याण डोंबिवलीत जोरदार पाऊस सुरु आहे. डोंबिवलीच्या नेहरू रोडवर पाणी साचले असून दुकानामध्ये पाणी शिरले आहे. तर वसईत मुसळधार पाऊस सुरूच आहे. तानसा नदीने गाठली धोक्याची पातळी गाठली आहे. वसईतील पांढरतारा पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे 12 गावांचा संपर्क तुटला आहे. तर नवी मुंबईत पावसात अडकलेल्या 375 जणांची यशस्वी सुटका करण्यात आली आहे. आर्टिस्ट व्हिलेज धबधब्यात अडकलेल्या 200 पर्यटकांना बाहेर काढण्यात आले आहे. तर अडवली-भूतवलीच्या ओढ्यापलीकडे शेतकरी अडकले होते, त्यांचीही सुटका करण्यात आली आहे.