मुंबई : 'ज्या भागात कोरोना वाढतोय, तिथे लॉकडाऊन (Lockdown) करावा लागेल. असा इशारा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिला आहे. 'लोकांच्या नोकरीचा प्रश्नही गंभीर आहे. पण लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय' असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत कोरोना (Corona) रुग्णांमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ होऊ लागली आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी पुन्हा एकदा इशारा दिली आहे. मुंबईत सुरु असलेली लसीकरणाची पाहणी अस्लम शेख यांनी केली. लोकांच्या नोकरीचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे, असं देखील अस्लम शेख यांनी म्हटलं आहे.


मुंबईत आज कोरोनाचे २३७७ रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंता वाढत असताना दिसत आहेत. दुसरीकडे मुंबईच्या आजुबाजुच्या शहरांमध्ये ही कोरोनाचा धोका वाढत आहे. 


आज राज्यात कोरोनाचे २३ हजार १७९ रुग्ण सापडले आहेत, तर ८४ रुग्णांचा मृत्यू झालाय. मुंबईत २३७७, नागपुरात ३३७० रुग्ण आढळलेत. मंगळवारी १७ हजारांवर रुग्ण होते. एका दिवसात तब्बल सहा हजारांनी रुग्ण वाढले आहेत.


कल्याण-डोंबिवली क्षेत्रात देखील कोरोनाचा कहर पाहायला मिळता आहे. आज दिवसभरात 593 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. कल्याण-डोबिवली भागातून हजारो लोकं कामासाठी मुंबईत येत असतात. ठाणे जिल्हा देखील हळूहळू कोरोनाचा हॉटस्पॉट बनण्याच्या मार्गावर आहे.