मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोनाची लस घेतलीय. लस घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. ते म्हणाले, 'राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे काही ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन  करावा लगेल. सार्वजणिक ठिकाणी गर्दी करणं टाळा गरज असेल तरच  घराबाहेर पडा. मुख्य म्हणजे मास्कचा वापर करणं बंधनकारक आहे.' असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



जेजे रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. डॉ. तात्याराव लहानेंच्या उपस्थितीत उद्धव ठाकरेंनी कोव्हॅक्सिन लस घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. पत्नी रश्मी ठाकरेंनीही यावेळी कोरोनाची लस घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांना कोरोना लस घेण्यासाठी आवाहन केले आहे. 



शिवाय काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागला तर त्याचा निर्णय येत्या काही  दिवसांत घेऊ. परिस्थिती अद्याप हाताबाहेर गेलेली नाही. त्यामुळे सतर्क राहण्याची गरज  आहे. अथवा नियम अधिक कडक करावे लागतील.  असं देखील त्यांनी सांगितलं आहे.