Lok Sabha Nivadnuk Nikal: शेअर बाजार कोसळला, सुुरुवातीच्या कलांनंतर गुंतवणूकदारांचा निरुत्साह
LokSabha Nivadnuk Nikal: एक्झिट पोलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोठ्या विजयाचे आणि सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. यामुळे गुंतवणूकदार आर्थिक वाढीच्या अपेक्षा करत असून सोमवारी शेअर मार्केटमध्ये उच्चांकी पातळी गाठली होती. मात्र रुपया स्थिर राहिला होता.
LokSabha Nivadnuk Nikal: जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारतातील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोठ्या विजयाचे आणि सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याचे अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आले आहेत. यामुळे गुंतवणूकदार आर्थिक वाढीच्या अपेक्षा करत असून सोमवारी शेअर मार्केटमध्ये उच्चांकी पातळी गाठली होती. मात्र रुपया स्थिर राहिला होता.
एनएसई इंटरनॅशनल एक्सचेंज डेटानुसार, मंगळवारी सुरुवातीच्या ट्रेडमध्ये निफ्टी 50 इंडेक्स फ्युचर्स 0.21 टक्क्यांनी वाढले आणि आणखी एक विक्रमी पातळी गाठण्याची शक्यता होती. पण मतमोजणी सुरु होताच शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्समध्ये जवळपास 1257 अंकांची घसरण झाली आहे. तर निफ्टीमध्ये 192 अंकांची घसरण झाली आहे.
एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर निफ्टी इंडेक्स सोमवारी 3.25 टक्क्यांनी वाढून 23,263.90 अंकांवर बंद झाला. बीएसई इंडेक्स सोमवारी 3.39 टक्क्यांनी वाढून 76,468.78 अंकांवर बंद झाला, जो आधीच्या 76,738.89 च्या सर्वोच्च शिखरावर होता. नॉन-डिलिव्हरेबल फॉरवर्ड्स (NDF) मार्केटमधील सुरुवातीच्या ट्रेडमध्ये रुपया थोडा मजबूत केला. सोमवारी रुपया 0.4 टक्क्यांनी वाढला.
"अपेक्षित निवडणुकीच्या निकालांवर मार्केट सध्या अवलंबून आहे. भारताबद्दल आशावादी न राहणे फार कठीण आहे," असं फेडरेटेड हर्मीस येथील उदयोन्मुख बाजार इक्विटीचे पोर्टफोलिओ व्यवस्थापक विवेक भुटोरिया म्हणाले आहेत. "गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी धोरणे आखली जात आहेत आणि जागतिक पुरवठा साखळी पुनर्संरेखित केल्याने भारताला कालांतराने फायदा होणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि रासायनिक निर्यातीच्या बाबतीत आम्हाला आधीच काही फायदे दिसू लागले आहेत", असंही ते म्हणाले आहेत.