मुंबई : राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्र्यांना अखेर यश आलं आहे. नाराज झालेले काकडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. मात्र त्यांची नाराजी दूर करण्यात भाजपला यश आलं असून संजय काकडे भाजपमध्येच रहाणार असल्याचं खुद्द मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संजय काकडे नाराज असल्याने ते पुण्यातील भाजपच्या लोकसभेच्या उमेदवाराला मदत करतील का असा असा प्रश्न उपस्थित होत होता. त्यातच खासदार संजय काकडे हे काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. इतकंच नाही तर त्यांना काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी देखील मिळणार असल्याची चर्चा होती. पण काकडे यांची नाराजी दूर करण्यात भाजपला यश आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय काकडे हे पुण्यातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. पण याआधी त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार नसल्याचे संकेत मिळत असताना त्यांची काँग्रेस प्रवेशाची चर्चा होती. आज राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार आणि काँग्रेस नेते प्रवीण छेडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी व्यासपीठावर संजय काकडे देखील उपस्थित होते. पुण्यातून संजय काकडेंना उमेदवारी देण्यास भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध आहे.