मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईमध्ये शेवटच्या टप्प्यात २९ एप्रिलला मतदान होणार आहे. राज्यामध्ये भाजप-शिवसेनेची युती तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत मुंबईमधून भाजप-शिवसेना युतीने सगळ्या सहा जागांवर विजय मिळवला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या निवडणुकीत मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात शिवसेनेने राहुल शेवाळे यांना उमेदवारी दिली आहे. राहुल शेवाळे यांचा सामना काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांच्याशी आहे.


२०१४ निवडणुकीचे निकाल


२०१४ सालच्या निवडणुकीमध्ये मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांनी काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांचा १,३८,३४२ मतांनी पराभव केला होता.


२०१४ निवडणुकीची आकडेवारी


उमेदवार

पक्ष

मिळालेली मतं

राहुल शेवाळे शिवसेना ३,८१,००८
एकनाथ गायक काँग्रेस २,४२,८२८
आदित्य शिरोडकर मनसे ७३,०९६
सुंदर बालकृष्णन आप २७,६८७
गणेश अय्यर बसपा १४,७६२