Are Mobile Allowed Inside Polling Booth: लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईमध्ये आणि उपनगरांत सोमवारी म्हणजेच 20 मे रोजी मतदान होणार आहे. मुंबईमध्ये पोलिसांनी सीआरपीसी कलम 144 अंतर्गत आदेश जारी केले आहेत. तसेच मतदारांना पडलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजेच मतदान केंद्रावर मोबाइल न्यायाचा की नाही याचं उत्तर ही पोलिसांनी दिलं आहे. मतदारांनी मतदान केंद्रावर मोबाइल घेऊन येऊ नये असे आदेश पोलिसांनी दिले आहेत. तसेच या आदेशाचं कडेकोटपणे पालन करावं असे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळेच मुंबईकरांनी मोबाइल घरी सोडूनच मतदानाला जाणं योग्य ठरणार आहे. 


मोबाइल संदर्भातील या नियमामागील तर्क काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरामध्ये मोबाइल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबई शहरामध्ये एकूण 2520 मतदान केंद्र आहेत. निवडणूक आयोगानेच मतदान केंद्रांमध्ये मोबाइल नेऊ नयेत असे निर्देश दिलेत. मतदान प्रक्रियेमध्ये बाधा निर्माण करणे, मतदान केंद्रावरील शांतता भंग करणे तसेच कायदा आणि सुव्यवसथेचा प्रश्न निर्माण करण्याच्या हेतूने मतदान केंद्राजवळ मोबाइलचा गैरवापर केला जाऊ शकतो अशी शक्यता असल्यानेच मोबाइल वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. नागरिकांनी मोबाइल घेऊन येऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे. 


मतदान केंद्राजवळ घुटमळत बसू नका


तसेच मतदान केंद्रांच्या जवळपास राजकीय बॅनरबाजी खपवून घेतली जाणार नाही. तसेच मतदान केंद्राजवळ स्पीकर्स, मेगाफोन वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. 20 मे रोजी सकाळी सहा वाजल्यापासून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत हे नियम लागू असतील. मतदान केंद्रांच्या परिसरामध्ये पोलीस, मतदान अधिकारी वगळता इतर कोणीही कारण नसताना भटकता कामा नये असे आदेशही देण्यात आले आहेत. असं असतानाही एखादी व्यक्ती नियम मोडताना आढळल्यास तिच्याविरोधात कारवाई केली जाईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे. पोलिसांना अशा कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. 


नक्की वाचा >> 48 नाही 'हे' 15 मतदारसंघ ठरवणार असली कोण? नकली कोण? सेना, NCP चा लागणार 'निकाल'


कुठे कुठे होणार मतदान?


महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 तारखेला पार पडणार आहे. एकूण 13 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे. यात उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर-पूर्व मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या मुंबईतील सहा मतदारसंघाचा समावेश आहे. याशिवाय अन्य 7 मतदारसंघांमध्ये ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी, धुळे या मतदारसंघाचा समावेश आहे. सध्या या मतदारसंघांचा विचार केल्यास येथील 6 मतदारसंघांमध्ये भाजपाची सत्ता असून शिवसेनेची सत्ता 7 मतदारसंघांमध्ये आहे. या मतदारसंघांमध्ये 20 मे रोजी सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.