Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असतानाच आता प्रत्येक पक्षाकडून मोर्चेबांधणीच्या कामांना वेग आला आहे. अनेक पक्षांनी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर, काही पक्षांनी महत्त्वाच्या मतदार संघांमधून नेमकी कोणाला उमेदवारी दिली जाणार याबाबतची नावं मात्र अद्यापही गुलदस्त्यात ठेवली आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या या राजकीय धुमश्चक्रीमध्ये सातत्यानं खडाजंगी पाहायला मिळतेय. या साऱ्यामध्ये मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या एका पोस्टनं सर्वांच्या नजरा वळवल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपच्या आशिष शेलार यांनी नुकतीच अभिनेता सलमान खान याच्या निवासस्थानी जात त्याच्यासह त्याचे वडील आणि इतर कुटुंबीयांची भेट घेतली. ही भेट नेमकी कोणत्या कारणानं होती, त्यामागचा हेतू काय होता आणि त्या भेटीमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली याबाबतची माहिती खुद्द शेलारांनीच ट्विट करत दिली. 


x वर पोस्ट करत काय म्हणाले शेलार? 


'सलीम खान, सलमान खान, हेलन आणि संपूर्ण खान कुटुंबीयांना दुपारच्या जेवणाच्या निमित्तानं भेटून छान वाटलं. यावेळी त्यांचं समाजकार्यातील योगदान, आरोग्य क्षेत्रातील काम आणि गरजुंना मदत करण्यासाठी जवळपास दोन दशकांहून अधिक काळापासून सुरू असणारे त्यांचे प्रामाणिक प्रयत्न यासंदर्भात चर्चा झाली', असी पोस्ट शेलार यांनी केली होती. 


हेसुद्धा वाचा : Kanyadan Not Essential : हिंदू विवाहपद्धतीमध्ये कन्यादानाची गरज नाही; न्यायालयानं का घेतला हा निर्णय? 


 



गेल्या बऱ्याच काळापासून उत्तर मध्य मुंबईमधील (North Central Mumbai Constituency) मतदारसंघामध्ये पुन महाजन यांच्याऐवजी आशिष शेलार यांना उमेदवारी दिली जाण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यातच शेलारांनी याच मतदारसंघातील रहिवासी असणाऱ्या सलमान खान आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाची भेट घेतल्यामुळं ही एक लंच डिप्लोमसी असून, शेलारांच्या नावे तिकीट निश्चित झाल्याचा तर्क अनेकांनीच व्यक्त केला.