Loksabha Election 2024 : बुधवारी पंतप्रधान मोदी मुंबईत; `हे` रस्ते राहणार बंद, आधीच करा वेळ आणि प्रवासाचं नियोजन
PM Narendra Modi Raod Show In Mumbai : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि मतदानाच्या पाचव्या टप्प्याच्या धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल होत आहेत.
PM Narendra Modi Raod Show In Mumbai : लोकसभा निवडणुकीच्या (loksabha election 2024) पाचव्या टप्प्याच्या (Fifth Phase of voting) प्रचाराला आता वेग मिळाला असून, शहरातील 6 मतदारसंघांमध्ये विविध ठिकाणी असणाऱ्या मतदान केंद्रांवर मतदान पार पडणार आहे. प्रत्यक्ष मतदानासाठी आता काही दिवस उरलेले असतानाच अनेक दिग्गज नेत्यांची पावलं मुंबईच्या दिशेनं वळताना दिसत आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा मागे नाहीत.
महायुतीच्या मुंबईतील उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी गुरुवारी, दिनांक 15 मे 2024 रोजी शहरात दाखल होत आहेत. 15 आणि 17 मे या दोन दिवशी पंतप्रधान मुंबई दौऱ्यावर असतील. मुंबईत महायुतीच्या शक्तिप्रदर्शनाशिवाय मोदींचा रोड शोसुद्धा असणार आहे. ज्यामुळं शहरातील वाहतुकीवर याचे थेट परिणाम होणार असल्याचं पाहता वाहतूक शाखेनं आधीच काही वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोणकोणत्या रस्त्यांवर No Entry?
पंतप्रधानांचा दौरा आणि त्यांच्या रोड शोच्या धर्तीवर गुरुवारी दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत एल बी एस मार्ग बंद असेल. एल.बी.एस मार्ग आणि एल.बी.एस मार्गाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यापासून 100 मीटरच्या अंतरापर्यंत 14 आणि 15 तारखेला No Parking असेल. तर, माहुल- घाटकोपर रस्त्यावर मेघराज जंक्शन ते आर बी कदम जंक्शनपर्यंत उत्तर आणि दक्षिणेकडे जाणार वाहतूक दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद असेल.
हेसुद्धा वाचा : तब्बल 6 कोटी PF खातेधारकांना 'या' एका निर्णयामुळं होणार मोठा फायदा; लग्न, घर, शिक्षणासाठी...
पंतप्रधानांच्या रोड शोसाठी LBS मार्गाचा वापर केला जाणार आहे. ज्यामुळं वरील बदल पाहता नागरिकांनी प्रवासासाठी पर्यायी या मार्गाचा वापर करावा असं आवाहन मुंबई वाहतूक विभागाकडून करण्यात आलं आहे. पंतप्रधानांच्या रोड शो चा मार्ग आर सिटी मॉल, अशोका मिल या ठिकाणावरून सुरु होऊन आर बी कदम चौकमार्गे पुढे पार्श्वनाथ चौकपर्यंत जाणार आहे.
मुंबईतील पहिल्या दौऱ्यात पंतप्रधान घाटकोपर ते मुलुंड असा रोड शो करणार असून, इथं ते मिहिर कोटेचा यांच्यासाठी प्रचार करताना दिसतील. तेव्हा आता खुद्द पंतप्रधान मोदींचा कोटेचा यांना निवडणुकीसाठी मतं मिळवण्यात किती फायदा होतो आणि मतदारांवर त्यांची जादू चालते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.