Yamini Jadhav in South Mumbai:  दक्षिण मुंबई शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना अशी लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून येथून अरविंद सांवत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ आली तरी महायुतीकडून उमेदवार ठरत नव्हता. आता शिंदेगटाकडून यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण मुंबईत अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव अशी लढत पाहायला मिळणार आहे. दक्षिण मुंबईतील जागा आधी मनसेला दिली जाणार अशी चर्चा होती. येथे बाळा नांदगावकर यांचे नाव चर्चेत होते. पण आपण बिनशर्थ पाठींबा दिल्याचे जाहीर केले. यानंतर भाजपकडून मंगलप्रभात लोढा या जागेसाठी इच्छुक असल्याचे सांगण्यात येत होते. तसेच राहुल नार्वेकरदेखील मतदार संघात मोर्चेबांधणी करताना दिसले. दरम्यान आता सर्वात शेवटी यामिनी जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. 


लोकसभा निवडणूक - 2024 साठी मुंबई दक्षिण मतदारसंघातून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून यामिनी यशवंत जाधव यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा !, असा शुभेच्छा संदेश देणारे ट्विट शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आले आहे. काही दिवसांपुर्वीच यामिनी जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. 


कोण आहेत यामिनी जाधव?


यामिनी जाधव या यशवंत जाधव यांच्या पत्नी आहेत. यशवंत जाधव हे मुंबई पालिकेचे सभागृह नेते आहेत. ईडीची धाड पडल्यानंतर जाधव कुटुंब चर्चेत आले होते. दरम्यान शिवसेनेत 2 गट पडल्यानंतर जाधव कुटुंब  एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले.


मुंबईमधील 3 जागा भाजप आणि 3 जागा शिवसेनेने लढायचे अशा पद्धतीने अगोदर ठरलं होत. सुरुवातीला ती जागा आम्ही लढाई म्हणून आम्ही तयारी देखील होतो. पण 20 ते 25 दिवसाअगोदरच हे ठरलं होतं, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.