LokSabha Election : लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्प्याचे मतदान पार झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवाऱ्याच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM  Eknath Shinde) यांनी ठाकरे गटाचे ठाणे लोकसभा उमेदवार राजन विचारे (Rajan Vichare ) यांच्यासाठी ठाणे (Thane News) पालथे घालत आहेत. यावेळी त्यांनी एकेकाळी उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) कट्टर समर्थक म्हणून घेणाऱ्या एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर प्रहार करताना मागेपुढे पाहिलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजन विचार यांचा प्रचार करताना एकनाथ शिंदे यांनी जनतेला आठवण करुन दिली की, खरी शिवसेना मी वाचवली आणि त्यामुळेच अनेक लोक माझ्यासोबत आहेत. त्यासोबत नकली शिवसेनेकडे धनुष्यबाण नाही, पक्ष नाही, असाही उल्लेख करायला ते विसरले नाहीत. शिवाय आपण एरियल फोटो काढणारा किंवा फेसबुक लाइव्ह करणारा मुख्यमंत्री नाही, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना निशाणा साधला. मी शेताच्या बांधावर जाऊन काम करणारा मुख्यमंत्री असल्याच त्यांनी सांगितलं. रविवारी ठाण्यात झालेल्या सभेत एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर प्रहार करताना दिसले. 


यावेळी ते म्हणाले की, गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीत मी सांगितलं म्हणून राजन विचारे निवडून आलेत, असं काही लोक ठाण्यात फिरून सांगत आहेत. पण  तुम्ही शिवसेनेच्या जोरावर निवडून आलात. आता तुम्हाला शिवसैनिक उभे करणार नाहीत, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. शिवाय आता या लोकसभेत महायुतीचा खासदार होणार आहे. हे सगळे माझे उमेदवार नगरसेवक, आमदार, खासदार निवडून आणतात. पण काही काळानंतर अनेक लोक या उमेदवारांना विसरुनही जातात. पण आम्ही सगळ्यांना उभं करतो आणि उभंही राहतो. त्यामुळेच गेल्या 10 वर्षांमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या रुपाने काम करणारा खासदार आपल्याला मिळाला आहे, हे विसरुन चालणार नाही.


आगामी निवडणुकीत आपल्याला मोदींना पंतप्रधान करायचं हे विसरु नका. तर यावेळी त्यांनी राहुल गांधींवरही खडे बोल सुनावले. काही लोक ठाण्यात आले, कुठेतरी फिरले, काय केलं हे सर्वांना माहिती आहे. त्याबद्दल मी नंतर सांगेन, अशा शब्दांत शिंदे यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. 


तर दुसरीकडे महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांना उद्योगासाठी कर्ज देण्याची योजना असल्याच ते म्हणाले. आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करत आहेत. त्यामुळे आगामी काळात महिलांना 50 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध देण्याचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील सभेतून दिले.