लोकसभा निवडणुकीचा कल । राज्यात युतीची सरशी तरीही जागा कमी, आघाडीची मुसंडी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी २४ तासने राज्यातील जनतेचा कल जाणून घेत व्यक्त केलेल्या अंदाजात पुन्हा राज्यात युतीची सरशी होईल. मात्र, काही जागा कमी होतील.
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी २४ तासने राज्यातील जनतेचा कल जाणून घेत व्यक्त केलेल्या अंदाजात पुन्हा राज्यात युतीची सरशी होईल. मात्र, काही जागा कमी होतील. त्याचवेळी काँग्रेस आघाडीची मुसंडी दिसून येत आहे. महाराष्ट्रात युतीलाच जास्त जागा मिळण्याची चिन्ह आहेत. युतीला ३० जागा तर आघाडीला १८ जागा मिळण्याची शक्यता आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर देशात चित्र बदलले असून त्याचा मोदी सरकारला फायदा होणार असल्याचे मत देशभरातील तज्ज्ञांनी झी २४ तासच्या कल देशाच्या या कार्यक्रमात व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र एकूण ४८ जागा आहेत. त्यापैकी भाजप - शिवसेना युती - ३० जागा जिंकेल तर काँग्रेस आघाडी - १७ जांगावर विजयी होण्याची शक्यता आहे. मागिल निवडणुकीत युतीने ४२ जागा पदरात पाडल्या होत्या. मात्र, आता १२ जागांमध्ये घट होताना दिसत आहे. याचा फायदा काँग्रेस आघाडीला होताना दिसत आहेत. कोकणात मात्र, युतीचाच विजय होण्याची शक्यता आहे. केवळ एक जागा भाजपला आणि उर्वतीर सर्व जागा या शिवसेनेच्या ताब्यात जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर मराहाष्ट्रात भाजपचेच वर्चस्व राहणार आहे, असा अंदाज दिसून येत आहे.
महाराष्ट्रात ४८ जागांपैकी पक्ष निहाय अशा जागा मिळतील.
- भाजप - १६
- शिवसेना - १४
- राष्ट्रवादी - १०
- काँग्रेस - ७
- इतर - १
देशात राज्यानिहाय कौल पाहा कोणाला?
उत्तर प्रदेश एकूण ८० जागा
भाजपा- ५०
काँग्रेस - ५
सपा-बसपा- २५
बिहार - एकूण ४० जागा
भाजपा - २८
काँग्रेस - १०
इतर - २
झारखंड एकूण १४ जागा
भाजपा - ७
काँग्रेस - ७
छत्तीसगड एकूण ११ जागा
भाजपा - ४
काँग्रेस - ७
पंजाब एकूण १३ जागा
भाजपा - १
काँग्रेस - १०
इतर - २
हरियाणा एकूण १० जागा
भाजपा - ६
काँग्रेस - ३
इतर - १
गुजरात एकूण २६ जागा
भाजपा - २४
काँग्रेस - २
कर्नाटक एकूण २८ जागा
भाजपा - ८
काँग्रेस - २०
काश्मीर एकूण ६ जागा
भाजपा - ३
काँग्रेस - ०
नॅशनल कॉन्फरन्स - २
पीडीपी - १