Loksabha Nivdnuk Nikal 2024 : सेना विरुद्ध सेना लढाईत ठाकरेंची सेना ठरली वरचढ ठरली आहे. मुंबईत महाविकास आघाडीनं धुव्वाधार विजय मिळवलाय. मुंबईच्या 6 पैकी 5 जागांवर महाविकास आघाडीनं बाजी मारलीय. तर केवळ उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपचे पियुष गोयल हे विजयी झालेत. तर इतर सर्व जागेवर महाविकास आघाडीनं आपला गड राखलाय. उत्तर पश्चिम मुंबईमधून ठाकरेंच्या सेनेतील अमोल कीर्तीकर निवडून आलेत. उत्तर पूर्व मुंबईतून संजय दिना पाटील, उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, तर दक्षिण मध्य मुंबईमधून अनिल देसाईंनी विजय मिळवलाय. त्याचबरोबर दक्षिण मुंबईतून शिंदेंच्या सेनेतील यामिनी जाधव यांचा पराभव करत ठाकरेंच्या सेनेचे अरविंद सावंत यांनी विजय मिळवलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाकरेंच्या शिलेदारांनी मारली बाजी
उत्तर पश्चिम मुंबईची जागा ठाकरे गटानं कायम राखलीये....शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांना पराभूत करत ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर विजयी झालेत. मुंबईतील प्रतिष्ठेची निवडणूक ठरलेल्या दक्षिण मध्य मुंबईत, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं बाजी मारली. या लोकसभा मतदारसंघात दोन शिवसैनिकांमध्ये लढत झाली, त्यात ठाकरे पक्षाचे अनिल देसाई विजयी झाले. शिंदे पक्षाचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे हे अनिल देसाई यांच्या विरोधात रिंगणात उभे होते. मात्र अनिल देसाईंनी त्यांना पराभव करत, दिल्ली गाठली आहे. अनिल देसाई यांनी आपल्या विजयाचं श्रेय शिवसैनिक आणि महाविकास आघाडीला दिलं आहे. 


दक्षिण मुंबईची जागा उद्धव ठाकरे पक्षानं कायम राखली आहे. या लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत विजयी झाले. त्यांनी शिवसेना शिंदे पक्षाच्या यामिनी जाधव यांचा पराभव केला. त्यामुळे पुन्हा एकदा अरविंद सावंत राजधानी दिल्लीतील संसदेमध्ये दिमाखात प्रवेश करणार आहेत. मुंबईतील या लढतीकडेही सा-यांचं लक्ष लागलेलं होतं. 


काँग्रेसलाही एक जागा
उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजप उमेदवार ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा पराभव केला. जबरदस्त चुरशीच्या ठरलेल्या या मतदारसंघात अटीतटीची लढत झाली. पहिल्या फेरीपासून उज्ज्वल निकम यांनी आघाडी घेतली होती. पण यानंतर शेवटच्या फेरीपर्यंत वर्षा गायकवाड यांनी हे अंतर भरून काढत थेट विजयावर शिक्कामोर्तब केलं.