मुंबई : सिद्धार्थ संघवी हत्या प्रकरणात हत्या केल्याची सर्फराजने कबुली दिलीय. दरम्यान, या हत्येत आपणास पैशांची गरज होती आणि पैशांसाठी आपण हत्या केल्याची कबुली सर्फराज शेखने कोर्टात दिलीय. सर्फराजला या प्रकरणी 19 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोपी सरफराज शेखनं अनेकदा आपला म्हणणं फिरवलंय... आणि पोलिसांना गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला... अगोदर बदला घेण्यासाठी खून केला असं सांगणाऱ्या कॅब ड्रायव्हर शेखनं आता सरफराजनं पैसे देण्यासाठी नकार दिल्यानं हत्या केल्याचं म्हटलंय.  


पाच तारखेला सिद्धार्थ संघवीचे अपहरण केल्यानंतर आरोपी सर्फराज शेखने सिद्धार्थच्या वडिलांना फोन करुन सिद्धार्थ सुखरुप असल्याची माहिती दिली होती... आणि याच फोन कॉलच्या आधारावर पोलिसांना सुरुवातीला अपहरणाची आणि नंतर हत्येचा सुगावा लावला. 


सिद्धार्थ संघवी यांची गाडी नवी मुंबईत सापडली होती. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं होतं. यातील एकानं त्यांची हत्या केल्याची कबुली दिली. सिद्धार्थ संघवी हे एचडीएफसी बँकेच्या कमला मिल येथील कार्यालयात काम करायचे. बुधवारी ते नेहमीप्रमाणे सकाळी साडेआठच्या सुमारास कामावर जाण्यासाठी मलबार हिल येथून निघाले. पत्नी आणि चार वर्षांच्या मुलासह ते मलबार हिल येथे राहतात. रात्री दहापर्यंत ते घरी परतले नाहीत म्हणून त्यांच्या पत्नीने बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावेळी सिद्धार्थ हे सायंकाळी साडेसातच्या सुमारास कमला मिल येथून निघाल्याचे सांगितले. यानंतर सिंघवी यांच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली. तपासादरम्यान गुरुवारी त्यांची मारुती कार नवी मुंबईत सापडली. या कारमध्ये रक्ताचे डाग सापडले होते.