`एक देश एक कर... मग, लॉटरीसाठी दोन निकष का?`
जीएसटीमुळे लॉटरी व्यवसाय धोक्यात आला आहे, अशी तक्रार करत राज्यभरातल्या लॉटरी विक्रेत्यांनी आझाद मैदानात भव्य मोर्चा काढला.
मुंबई : जीएसटीमुळे लॉटरी व्यवसाय धोक्यात आला आहे, अशी तक्रार करत राज्यभरातल्या लॉटरी विक्रेत्यांनी आझाद मैदानात भव्य मोर्चा काढला.
'लॉटरी बचाव महाकृती समिती'मार्फत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राज्यातील हजारो लॉटरी व्यावसायिक सहभागी झाले होते.
'एक देश एक कर' आहे मग महाराष्ट्र सरकारची लॉटरी महाराष्ट्रात विकली तर १२ टक्के जीएसटी आणि इतर राज्यात विकली तर २८ टक्के जीएसटी अशी विभागणी का? असा सवाल लॉटरी विक्रेत्यांनी सरकारसमोर उपस्थित केला आहे.
जीएसटीला विरोध नाही मात्र देशभरात सरसकट लॉटरी व्यवसायावर १२ टक्के जीएसटी आकारला जावा, अशी मागणी लॉटरी व्यावसायिकांची आहे.
दरम्यान, लॉटरी व्यावसायिकांशी सरकारनं एका बैठकीत चर्चा केली. टॅक्स १२ टक्के असावा, अशी मागणी राज्यानेही केली आहे. मोर्चा निमित्ताने पुन्हा एकदा ही मागणी केंद्राकडे पोहचवू. मात्र, याबाबत जीएसटी कौन्सिल निर्णय घेऊ शकेल, अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसंच राज्यात ऑनलाईन लॉटरी सुरू करण्याबाबत अधिकार लॉटरी आयुक्तांकडे दिले आहेत. ते याबाबत लवकरच धोरण ठरवू निर्णय घेतील, असंही केसरकरांनी स्पष्ट केलंय.