मुंबई : मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्या कोकण वगळता राज्याच्या इतर भागात पावसाचा जोर ओसरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेषत विदर्भ, मराठवाडा भागात पाऊस कमी होईल असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय. त्यामुळे या या भागातील शेतक-यांनी पाण्याचं नियोजन करुनच दुबार पेरणी करावी असा सल्ला वेधशाळेने दिलाय. 


दहा ऑगस्टनंतर मराठवाडा, विदर्भात पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण होईल असा अंदाजही वेधशाळेने वर्तवलाय. 


गेल्या आठवड्यात राज्यातील सर्वच भागांत पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची पेरणी झालीये. तलावक्षेत्रातही दमदार पाऊस बरसल्याने अनेक तलावे भरली.