Maahrashtra Assembly : विरोधी पक्ष नेतेपदी अजित पवार यांची निवड
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी निवड
Maharashtra Assembly : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. सभागृहातील सदस्यांकडून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं.
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील 40 आमदार बाहेर पडले महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर झालेल्या सत्तासंघर्षात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यानंतर विधानसभतेली विरोधी पक्ष नेते कोण याबाबत चर्चा सुरु झाली.
विरोधीपक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातच चुरस असल्याचंही बोललं गेलं. पण अखेर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचं संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून कुणाला विरोधी पक्षनेतेपद दिलं जाणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं.