Maha Vikas Aghadi Morcha : महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी, शांततेत मोर्चा काढा - फडणवीस
Maha Vikas Aghadi Morcha In Mumbai : महाविकास आघाडीच्या 17 डिसेंबरला निघणाऱ्या मोर्चाला परवानगी देण्यात आली आहे, अशी (Maharashtra Political News) माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Maha Vikas Aghadi Morcha In Mumbai : महाविकास आघाडीच्या 17 डिसेंबरला निघणाऱ्या मोर्चाला परवानगी देण्यात आली आहे, अशी (Maharashtra Political News) माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. (Maharashtra News in Marathi) दरम्यान, मुंबई पोलिसांनी अजूनही या मोर्चाला कोणतीही लिखित परवानगी दिलेली नाही, अशी माहिती समोर आली आहे. (Maharashtra Political News) मोर्चाला परवानगी मिळाली नाही तरही मोर्चा काढण्याचा निर्धार मविआच्या नेत्यांनी केला होता. (Maharashtra News in Marathi) विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी इशारा दिला होता. दरम्यान, दुसरीकडे ठाकरे गटाच्या शिवसेनेने मोर्चासाठी जोरदार तयारीची सुरुवात केली आहे. यावेळी मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
काय म्हणालेत उपमुख्यमंत्री फडणवीस?
मोर्चाला परवानगी दिली आहे. लोकशाही मार्गाने प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यांचा मार्ग ठरलेला आहे. त्यांनी कायदा सुव्यवस्था राखली जावी, असे आमची अपेक्षा आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यावं असं नाही. त्यांच्यासोबत होते तेव्हा चांगले आणि त्यांच्या विरोधात गेले की दलाल ही भाषा चुकीची आहे, असे फडणवीस म्हणाले. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई - गोवा महामार्गाबाबत भेट घेतली. केंद्रीय नितीन गडकरी यांच्याशी देखील याबाबत चर्चा केली जाणार आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत योग्य वेळी माहिती देऊ, अशी माहिती यावेळी फडणवीस यांनी दिली.
महाविकास आघाडी नेत्यांचा इशारा
महाविकास आघाडीच्या मुंबईतील महामोर्चासाठी पोलिसांकडून अजून लेखी परवानगी दिलेली नाही. आज पोलीस महामोर्चाला परवानगी देतील अशी अपेक्षा आहे. महामोर्चासाठी महाविकास आघाडी ठाम आहे. लोकशाही मार्गाने मोर्चा काढणारच असा निर्धार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चाला परवानगी दिल्याचे स्पष्ट केले आहे. त्याआधी लोकशाहीमध्ये कोणाला आंदोलन करता येते. आम्ही काही अडकाठी करणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते.
"महाराष्ट्रद्रोही विरोधात हल्लाबोल" या घोषवाक्याखाली महाविकास आघाडी रस्त्यावर उतरणार आहे. स्टेज उभारणीला मुंबई पोलीस सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मोर्चाच्या तयारीसाठी शाखा प्रमुख आणि माजी नगरसेवकांना दुपारी 3 नंतर रिचर्डसन क्रूडास जवळ जमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी अनिल परबांसह इतर सेना नेतेही उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, या मोर्चासाठी ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांनी तीन लाखांहून अधिक कार्यकर्ते जमवण्याचं लक्ष ठेवलं आहे. विराट मोर्चा ऐतिहासिक करण्याचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीच्या या मोर्चाला समाजवादी पक्षापासून सीपीआय, मराठा क्रांती ठोक मोर्चा या संघटनांनी देखील पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यपाल हटाओपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्याबाबतच्या मागण्या मोर्चात पाहायला मिळणार आहेत.