मुंबई : पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. जानकरांनी त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचं ठरवल्यानं त्यांच्या उमेदवारीबाबत केंद्रीय नेतृत्व निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अकरा जागांसाठी १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. १२ वा अर्ज भाजपचे सांगली जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी दाखल केला आहे. त्यामुळे पृथ्वीराज देशमुखांचा अर्ज मागे घेणार की जानकरांचा याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. 


11 विधानपरिषदच्या जागेसाठी महादेव जानकर हे निवडणूक लढवत आहेत. ते आधी भाजपाच्या चिन्हावर परिषदवर निवडणून आले होते. मात्र काल विधानपरिषदचा निवडणुकीसाठी अर्ज भरतांना त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर अर्ज भरला. तेव्हा त्यांनी दुसऱ्या पक्षाद्वारे निवडणूक लढवली असा तांत्रिक मुद्दा निघत पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत निवडणूक लढवण्यास 6 वर्षांची बंदी येऊ शकते. म्हणून हा तांत्रिक मुद्दा लक्षात घेता त्यांनी काल अर्ज भरण्यापूर्वी सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला.


तसंच जानकर हे त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत असल्याने केंद्रीय नेतृत्व त्यांच्याबाबत निर्णय घेईल. भाजपाच्या 6 उमेदवारांमध्ये कोण अर्ज मागे घेणार याबद्दल केंद्रीय संसदीय समिती निर्णय घेईल. मात्र विधानपरिषद निवडणूक ही बिनविरोध होईल हे निश्चित.