मुंबई : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो भीम अनुयायी मुंबईतल्या चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येत असतात. यंदा कोरोनाचे निर्बंध शिथिल असले तरी ओमायक्रॉनचं सावट आहे. त्यामुळे लोकांनी गर्दी करू नये, कोरोनाचे नियम पाळूनच अभिवादन करावं असं आवाहन करण्यात आलंय. अनुयायांना थेट ऑनलाइन दर्शनही घेता येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाडच्या चवदार तळ्यावर दलित मित्र खांबे गुरुजी ट्रस्टच्या माध्यमातून अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने महाडच्या चवदार तळे परिसरात मेणबत्या प्रज्वलित करून, अभिवादन करण्यात आलं. महाड आणि परीसरातील शेकडो आंबेडकरी अनुयायी  चवदार तळ्यावर उपस्थित होते.



भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या  महापरीनिर्वाण दिनाच्या पूर्व संध्येला मनमाड शहरातील आंबेडकरी जनतेने  कॅण्डल मार्च काढून अभिनव पद्धतीने आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन केले. मनमाड शहर  आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला मानलं जातं. सफेद वस्त्र परिधान करत हातात मेणबत्ती घेवून  बुद्धम शरणम गच्छामीच्या जयघोषात शिस्तबद्ध पद्धतीने हा कॅण्डल मार्च काढला.  विविध पक्ष, संस्था, संघटना तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते  कॅण्डल मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले .