मुंबई : शिवसेनेच्या आणखी एका आमदाराने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची साथ सोडली आहे. शिवसेनेचे (ShivSena) निष्ठावंत समजले जाणारे आमदार मंगेश कुडाळकर हे सुद्धा गुवाहाटीला रवाना झाले आहेत. मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) हे मुंबईतल्या कुर्ला नेहरुनगरचे शिवसेना आमदार आहेत. झी 24 तासशी बोलताना त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमदार मंगेश कुडाळकर सुरतमार्गे गुवाहाटीला जाणार आहेत. सकाळपर्यंत माझा विचार नव्हता, मात्र काही कारणाने जावं लागत असल्याचं मंगेश कुडाळकर यानी झी 24 तासशी बोलताना सांगितलं. आमदार मंगेश कुडाळकर हे उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जात होते, त्यामुळे त्यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.


चार आमदार गुवाहाटीत दाखल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना परत येण्याचं आवाहन केल्यानंतर ही शिवसेनेचे 4 आमदार आज शिंदे गटात पोहोचले आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. एकनाथ शिंदे त्यांच्या आमदारांसोबत गुवाहटीच्या एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्यांच्या गटात आता आणखी 4 आमदार दाखल झाले आहेत. 


गुवाहटीला गेलेल्या आमदारांमध्ये गुलाबराव पाटील, चंद्रकांत पाटील, योगेश कदम, मंजुळा गावित यांचा समावेश आहे. हे चारही आमदार हॉटेलमध्ये पोहोचताच त्यांचं इतर आमदारांनी स्वागत केलं. या आमदारांना एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.