Maharashtra Politics : महाराष्ट्रातून लोकसभेसाठी 45+ जागांचं टार्गेट ठेवणाऱ्या महायुतीचा (Mahayuti) मकर संक्रातीपासून दणक्यात प्रचार सुरु होणार आहे. 14 जानेवारीपासून सर्व जिल्ह्यांमध्ये महायुतीचे मेळावे घेण्यात येणार आहेत. महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत प्रचाराची तारीख जाहीर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महायुतीची महारणनीती 
महायुतीने लोकसभेसाठी 45+ जागांचं टार्गेट ठेवलं आहे. तर विधानसभेसाठी 225+ जागांचं लक्ष्य ठेवलं आहे. यासाठी जिल्हा, तालुका, बूथ पातळीवर मेळावे घेतले जाणार आहेत. मेळाव्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि अजित पवार (Ajit Pawar) मार्गदर्शन करणार आहेत. इतकंच नाही तर शिंदे, फडणवीस, पवारांच्या प्रत्येक जिल्ह्यात संयुक्त सभा होणआर आहेत. मित्रपक्षांसोबत समन्वय समिती बैठकाही घेतल्या जाणार आहेत. 


तीन बलाढ्य पक्ष एकत्र येऊन स्थापन झालेल्या महायुतीची महारणनीती ठरलीय. पण महायुतीच्या प्रचाराचा एकत्रित कार्यक्रम ठरला असला तरी कुणाला किती जागा मिळणार, शिंदे गट-अजित पवार गटाच्या पदरात किती मतदारसंघ पडणार, जागावाटपात कोण मोठा भाऊ ठरणार याची चर्चा सुरु झालीय. 


दरम्यान, लोकसभेनासाठी भाजप 26, तर शिंदेगट आणि अजित पवार गट 22 जागा लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप 26, तर शिंदे गट 22 आणि अजित पवार गट 22 जागा लढवताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या तिन्ही पक्षांकडून याबद्दल अधिकृत माहिती लवकरच जाहीर केली जाऊ शकते. 


जागा वाटपावरुन राडा?
लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येतेय तसे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीये. राज्यात महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे एकजुटीनं ही निवडणूक लढवण्याचं मोठं आव्हान महायुतीसमोर आहे.या निवडणुकीसाठी भाजपचा फॉर्म्युलाही उघड झाल्याची चर्चा आहे. या फॉर्म्युल्यानुसार जुन्या नेत्यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाच्या पाच ते आठ खासदारांऐवजी नवे चेहरे देणे गरजेचं असल्याचं भाजप श्रेष्ठींचं मत असल्याची माहिती समोर येतेयं. भाजपच्या फॉर्म्युल्यानुसार, शिवसेनेच्या सत्ताधारी शिंदे गटातील काही विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. यात मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येकी 2, तर मुंबईतील एका जागेवारील उमदेवार बदलण्याची नितांत गरज असल्याचं मत भाजपच्या सर्व्हेमध्ये करण्यात आलं.