Andheri Bypoll Result 2022 : राज्यातल्या बहुचर्चित अशा अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. (Maharashtra Political News) शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके विरुद्ध अपक्ष उमेदवाराची लढत रंगणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात
होत आहे. आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी 3 नोव्हेंबरला मतदान पार पडलं होतं. शिवसेनेनं रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना तिकीट दिलं होतं. या पोटनिवडणुकीमध्ये 7 उमेदवार रिंगणात होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Andheri By Election 2022) कमी प्रमाणात मतदान (Voting) झाले. या निवडणुकीत नोटाचा जास्त वापर झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदावर किती मते घेतात याचीच उत्सुकता आहे. कारण अंधेरीकरांनी पोटनिवडुकीला अल्प प्रतिसाद दिला आहे. या पोटनिवडणुकीच्या रिंगणात एकूण 7 उमेदवार होते.(andheri east assembly constituency by election 2022 )


मतदान मोजणीला आज सकाळी 8 वाजता सुरुवात होईल. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. शिवसेना फुटीनंतरची विधानसभा मतदारसंघासाठी ही पहिलीच निवडणूक आहे. संपूर्ण अंधेरी पूर्व मतदारसंघात एकूण 256 केंद्रावर या पोटनिवडणुकीचं मतदान पार पडलं. या पोटनिवडणुकीने संपूर्ण महाराष्ट्राचंच नाही, तर देशाचं लक्ष वेधून घेतले आहे. 


मुंबई उपनगर जिल्ह्याच्या प्रसार माध्यम कक्षाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात  2 लाख 71 हजार 502 मतदार आहेत. तसेच एकूण 31.74  टक्केच मतदान झाले आगे. या आकडेवारीनुसार या पोटनिवडणुकीत जवळपास अंदाजे 87 हजार जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. त्यामुळे ऋतुजा लटके किती मते घेतात याचीच मोठी उत्सुकता आहे.


पोटनिवडणूक रिंगणात हे 7 उमेदवार  


1-  ऋतुजा रमेश लटके (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)
2 -  बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी - पीपल्स)
3 -  मनोज नायक (राईट टू रिकॉल पार्टी)
4 -  नीना खेडेकर (अपक्ष)
5 - फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)
6 - मिलिंद कांबळे (अपक्ष)
7 - राजेश त्रिपाठी (अपक्ष)