मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत १४ जणांना उमेदवारी घोषीत करण्यात आली आहे. दरम्यान, दुसऱ्या यादीकडे डोळे लावून बसलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, मंत्री विनोद तावडे, चंद्रकांत बावनकुळे, राज पुरोहित यांची नावे नसल्याचे त्यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. तर बारामतीतून राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्याविरोधार गोपीचंद पडाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच राष्ट्रवादीची उमेदवारी मिळालेल्या नमिता मुंदडा यांना भाजप प्रवेशानंतर दुसऱ्या यादीत उमेदवारी जाहीर झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपने उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर अनेकांची त्यात नावे नाही. नाव नसल्याने अनेक इच्छूकांना डच्चू दिल्याचे बोलले आत आहे. दुसऱ्या यादीत नाने यावं यासाठी अनेकांनी भाजप नेत्यांकडे तळ ठोकला होता. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाले नाही. तर काहींनी आपल्या मतदारसंघातील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचे नाट्य सुरू केले आहे.



नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपने उमेदवारी जाहीर न केल्याने विद्यमान आमदार बाळासाहेब सानप अस्वस्थ झाले आहेत. सानप यांच्या निवासस्थानी नाशिकच्या पंचवटी आणि त्रंबकेश्वर येथील 15 आणि १४ भाजप नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचा पवित्रा घेतला असून सानप यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी शक्तिप्रदर्शन देखील केले.